"कुछ करना हो तो, आसमान मे उडना बेस्ट ऑपशन हैं!"- फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने भारतीय वायु सेनेच्या पहिल्या तीन महिला लढाऊ विमान पायलट म्हणून भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा उद्गारण्यात आलेले हे वाक्य खूपच प्रेरणादायी!
2015 मध्ये भारतीय वायु सेनेने एक ऐतिहासिक निर्णय घेत महिलांना combat role मध्ये सहभागी करून घेतले आणि वायुसेनेमध्ये सहभागी असलेल्या महिलांच्या आयुष्यात नवी वाटचाल सुरू झाली. त्यांच एक यश म्हणजे फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत 2021 च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय वायुसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे . ज्याची थीम 'मेक एक इंडिया' आहे. फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत हि भारताची पहिली महिला फ्लाईट लेफ्टिनेंट असेल जिला प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये वायु सेनेचा भाग म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अशी गोष्ट भारताच्या इतिहासात पहिल्यांदा होत असल्याने निश्चितच महिलांसाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे.
परंपरागत पुरुषप्रधान जगामध्ये भावना कांतने लिंगभेदाच्या बेड्या तोडत जगाला दाखवून दिलं की जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी महिला करू शकत नाही. जगातील 195 पेक्षा अधिक देशांपैकी फक्त 15 देशांमध्ये महिलांना combat मिलिटरी roles मध्ये सहभागी होण्याची अनुमती आहे. त्यात भारताचा समावेश होतो यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते का? निश्चितच नाही!अशाप्रकारे अजूनही मोठ्या प्रमाणावर लिंगभेद करत असलेल्या समाजांमध्ये विशेष करून भारतीय उपखंडामध्ये जिथे महिलांना जगताना वेगवेगळ्या अन्यायाला समोर जावं लागते त्या देशांनी आणि समाजाने यातून निश्चितच बोध घेतला पाहिजे.