अभिनेत्री यामी गौतम विवाह बंधनात अडकली, ऊरी सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत लग्न

04 Jun 2021 20:52:40

अभिनेत्री यामी गौतम हिचे नाव तिच्या सुंदर अभिनयासाठी तर प्रसिद्ध आहेच. मात्र आज तिच्या नावाची चर्चा होतेय ते तिच्या लग्नामुळे, अभिनेत्री यामी गौतव हिने ऊरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत लग्न केले आहे. आज दोघांनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले, आणि एकच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस त्यांच्या या पोस्ट्स वर पडत आहे.


yami and aditya_1 &n


यामी गौतम हिला विकी डोनर, ऊरी, बाला, काबिल, गिन्नी वेड्स सन्नी अशा अनेक चित्रपटांमध्ये बघितले आहे. एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीतून यामी जगासमोर आली आणि प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिला एक एक करत अनेक मोठे चित्रपट मिळायला लागले. केवळ हिंदीच नाही तर यामीने साउथच्या सिनेमांमध्ये देखील खूप काम केले आहे आणि नाव कमावले आहे. एकूणच यामी गौतमचे फॅन फॉलोइंग मोठे आहे.

  

यामी आणि आदित्य या दोघांच्या परिवारांच्या मोजच्या लोकांसोबतच एक छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. दोघांनीही लग्नाचे सुरेख फोटोज इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले आहेत. आणि यामुळे चाहत्यांनी मात्र कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.


Powered By Sangraha 9.0