इंडियन रॉबिनहूड टंट्या भील
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत जेव्हा ब्रिटिश राजवटीखाली होता तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणारे शूरवीर आपल्याला माहित आहेत. असेच शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढत राहणारे जननायक म्हणजे टंट्या भील. ज्वारीच रोपटे जेव्हा मोठे होते तेव्हा ते सुकल्यावर त्याला टंट्या म्हटलं जाते. त्याचं प्रकारे टंट्या भील हेसुद्धा लहानातून मोठे होत असताना सुकायला लागले होते आणि ते ज्वारीच्या रोपट्याप्रमाणे दिसायचे. टंट्या भील यांना 'इंडियन रॉबिनहूड ' म्हणूनही संबोधले जाते. असं म्हटले जाते की मुळात रॉबिनहूड हा तीरन्दाज आणि तलवारबाजी मध्ये कुशल होता. तो श्रीमंतांकडून लुटूलेला माल स्वतःकडे न ठेवता गरीबांमध्ये वाटून टाकायचा.
अगदी त्याचं प्रकारे टंट्या भील सुद्धा भारतातील ब्रिटिशांना लुटून मिळवलेला माल गरीब तसेच आदिवासी लोकांमध्ये वाटून टाकायचे. ते इतके चपळ होते की काही क्षणात तो नजरेसमोर गायब व्हायचे. याचं कारणामुळे ब्रिटीश सरकारला त्यांना पकडण्यासाठी कितीतरी वर्षे लागली होती. टंट्या भीलची ओळख जनसामान्यांमध्ये टंट्या मामा अशीही होती. या जननायकाचा जन्म १८४०-१८४२ मध्ये मध्यप्रदेश मधील खांडवा जिल्ह्यात एका आदिवासी कुटुंबात झाला होता. त्याचे वडील तीरन्दाजी आणि तलवारबाजी मध्ये निपुण होते. याची गोडी टंट्या भील यांना लागायला लागली आणि तेही यात लवकरच कुशल झाले. हळूहळू ते ब्रिटीश करत असलेला अन्याय पाहू लागला आणि त्यांच्याविरुद्ध लढण्याचे त्यांनी ठरवले.
ब्रिटीश जेव्हा त्यांचा खजिना इकडून तिकडे घेऊन जात असत विशेषतः जंगलांमध्ये, तेव्हा अचानक टंट्या भील आणि त्याचे साथी येऊन तो खजिना लुटत असत. ते गुरिल्ला युद्ध करण्यात तरबेज होते. मध्यप्रदेशचा जननायक टंट्या भील याला १८८९ मध्ये पकडून फाशी देण्यात आली. अशाप्रकारे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे टंट्या मामा हे भारतीयांच्या कायमच स्मरणात राहतील. भारत सरकारने २०२२ मध्ये स्वातंत्र्यापुर्तीचे ७५ वर्ष साजरी करण्यासाठी सुरु केलेल्या आजादी का अमृत महोत्सव मध्ये ट्वीट करून टंट्या भील यांचा गौरव केला आला. आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन १२ मार्च २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साबरमती, गुजरात येथे करण्यात आले.