पाकिस्तानची सिविल वॉर च्या दिशेने वाटचाल?

15 Apr 2021 15:34:39
अस्थिर सरकारे आणि दिवसेंदिवस बिघडत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानची अवस्था आधीच खूप दयनीय झाली आहे. त्यात भरीत भर म्हणजे आता लोकं रस्त्यावर उतरून गदारोळ करत आहेत. पाकिस्तानमधील ही अवस्था एका कट्टरपंथीय मौलानाच्या अटकेवरून होत आहे. त्याचं नाव मौलाना साद आहे. मौलाना साद हा 'तहरीक-ए-लब्बैक' या कट्टरपंथीय पक्षाचा मुख्य नेता आहे. याला काही दिवसांपूर्वी अटक केलं होत. त्याचा परिणाम म्हणून त्याचे समर्थक रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत. या निदर्शनांना कंटाळून पाकिस्तानचे लोक स्वतःच जाऊन मौलाना सादच्या समर्थकांबरोबर लढत आहे. यामुळे पाकिस्तान मध्ये भयंकर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
civil war_1  H
पाकिस्तान सरकार हे थांबवण्यासाठी उशिरा पाऊले उचलू लागले आहे. पाकिस्तान चे गृह मंत्री शेख़ रशीद अहमद (Interior Minister Sheikh Rashid Ahmed) यांनी सांगितले की सन १९९७ च्या 'आंतकवाद विरोधी कायदा' या नियमानुसार तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या पक्षावर सरकार बंदी घालत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पाकिस्तानमध्ये 'तहरीक-ए-लब्बैक' (Tehreek-i-Labaik Pakistan) चे समर्थक आणि सुरक्षा रक्षक यांमध्ये हिंसक झड़प चालू आहे. याचाच परिणाम म्हणून आतापर्यंत नागरिक आणि सुरक्षा रक्षक यांमध्ये जीवित हानी झाली आहे. समर्थकानी रस्ते अडवून ठेवल्याने नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
 
पैग़म्बर मोहम्मद यांच्या रेखाचित्राच्या प्रकाशनाला 'तहरीक-ए-लब्बैक' ने विरोध दर्शवून फ्रांसच्या राजदूतला या देशातून काढून टाकले जावे अशी मागणी केली होती. जर ही मागणी २० एप्रिल पर्यंत पूर्ण झाली नाही तर सरकार विरुद्ध प्रदर्शन करण्याची धमकी दिली. त्यासोबतच फ्रान्सकडून येणाऱ्या वस्तूंची आयात बंद करण्याची मागणी केली होती.


Powered By Sangraha 9.0