प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर

26 Mar 2021 14:39:00




प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. आजच ते बांगलादेश येथे पोहचले. बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी त्यांचे स्वागत केले. २६ मार्च १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान पासून बांगलादेश हे राज्य उदयास आले. या घटनेला २६ मार्च २०२१ रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा दौरा करोना महामारी नंतर पहिलाच परराष्ट्रीय दौरा आहे.
 
pm modi_1  H x
 
बांगलादेशच्या आजादीसाठी पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात हे युद्ध झाले होते. भारताने या युद्धात बांगलादेशच्या बाजूने महत्वाची भूमिका बजावली होती. हे युद्ध १३ दिवसापर्यंत चालू होते. जे जगातील सर्वात कमी वेळेत झालेलं युद्ध आहे. खूप आधीपासून भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. सध्या काही विषयावर तणाव वाढत आहेत त्याचे कारण चीन असू शकते .त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.
 
 
पश्चिम बंगाल मध्ये विधासभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासोबत या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मतुआ महासंघाचे संस्थापक हरिचंद्र ठाकुर यांच्या ओरकांडी मंदिराला भेट देतील. मतुआ समुदायाचे बांग्लादेशशी चांगले संबंध आहेत आणि पश्चिम बंगाल मधील मतुआ समुदायाची एकूण लोकसंख्या लगभग दोन करोड़ आहे. त्यामुळे या दौऱ्याचा या समुदायावर काय परिणाम होईल हे बघण्यासारखे असेल. भारताचे राष्ट्रगान जन मन गण आणि बांग्लादेशचे ''आमार सोनार बांग्ला'', दोन्ही रवींद्रनाथ टैगोर यांनी लिहले आहे. बांग्लादेश हा दक्षिण आशियामधला भारताचा सगळ्यांत मोठा ट्रेड पार्टनरसुद्धा आहे .














Powered By Sangraha 9.0