'प्रवास'
इथे प्रत्येक गोष्टी मागे कायमचं कारण असत,
म्हणूनच तर आपलं मन ते मिळवण्यासाठी धावत असत,
तुमचं असं कधी झालाय का?
तुम्हीच तुमच्या मनाची उलटतपासणी केलीये का?
अर्थातच मी टी केली Rather ती झाली.
हा असा प्रवास आहे ज्यात,
खाली जमीन किती पाणथळ आहे कि खोल आहे याचा सुगावा न लागता नुसत त्या पाण्यातून चालत राहायचं,
आणि त्याचाच मागोवा घेत पुढे सरकत राहायचं.
मग अचानक खाडकन डोळे उघडले कि,
आपण कुठेतरी अगदी पाण्याच्या मध्यावर असतो,
मग साहजिकच आता मन बांध शोधायच्या मागे लावत.
खरी फरफट बांध शोधताना होते,
मन आणि बुद्धी तिथेच गोते खाते.
“किनाऱ्यावर उभे राहणार्याला पाण्यात जायची घाई असते आणि पाण्यात असणार्याला किनाऱ्यावर येण्याची!”
चालायचचं!
प्रवास असाच चालू राहील नवीन शोध आणि वेध घेत...!
-प्रियंका कांबळे