प्रजासत्ताक दिवस : भारताच्या पायाभरणीची सुरुवात!

21 Jan 2021 15:57:54
 -Priyanka Kamble 
  
 उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवला
 
भारतीय म्हणून या ओळी ऐकून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात अभिमानाची गोष्ट जी नजरेसमोर येते ती म्हणजे भारत या भूमीचा सूत्रधार असलेला एक ग्रंथ. भारताची राज्यघटना किंवा भारताचे संविधान! 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली राज्यघटना तयार झाली, खुद्द भारतीय जनतेच्या प्रतिनिधीनीने ती बनवली. आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर स्वदेशीच. पण मग 26 जानेवारी 1950 हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरी करतो? कधी विचार केलात का?
 
26 जानेवारी 1930 हा दिवस राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून पूर्ण-स्वराज म्हणून साजरी करण्यात आला होता. पुढे त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी1950 रोजी आपली राज्यघटना अमलात आणली गेली. याच दिवशी दिडशे वर्षांपूर्वीच्या परकीय जुलमातून भारताला लिखित पद्धतीने मुक्ती मिळाली. याच दिवसापासून १८ वयापेक्षा मोठ्या असलेल्या भारतीयांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. अशा या ऐतिहासिक दिवसाबद्दल माहित करून घेणं गरजेचं नाही का?

1_1  H x W: 0 x 
 
आपण या दिवसाला प्रजासत्ताक दिवस असे म्हणतो. यामागे एक मोठे कारणही आहे. आपल्या मराठीत एक सुंदर म्हण आहे, जीभ भाजली की ताक पण फुंकून प्यावं. तात्पर्य काय तर मुळात प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेकडून, प्रजेसाठी मिळालेली सत्ता. आपला देश लोकशाही म्हणून नावाजलेले देश आहे. म्हणजे इथे एक केंद्रीय सरकार आणि काही राज्य सरकारे आहेत. त्यांना दर पाच वर्षांनी लोक निवडून देतात आणि ते सत्ताधारी होतात. सहजीकच सत्ता मिळाली की माणूसच तो शेवटी, फोफावतोच! या अशा परिस्थितीला लगाम लावण्यात आपली भारतीय राज्यघटना खूप मोठ पात्र निभावते.
 
याच दिवशी आपल्या राजधानी दिल्लीत, शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून ‘परेड’ होते. तिन्ही दलाचे सैनिक हजर असून मुख्य पदावर आपले राष्ट्रपती विराजमान होतात. आता ते का बरं? कधी विचार केलाय? 15 ऑगस्ट1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. आधी भारत ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांवर चालत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कोणत्या कायद्यावर चालवा, यासाठी संविधान आखायची परवानगी आपल्याला मिळाली. 1947 ते 1950 या काळात भारत हा ‘भारतीय सरकार कायदा, 1935’ नुसार चालत होता. पुढे राज्यघटना अमलात आणताना भारताला जगजाहीर करायचं होतं की आम्ही आता ‘सार्वभौमत्व’ राष्ट्र आहोत. भारतीयांवर कोणत्याही परकीय शक्तीचा, कोणाचाही अधिकार नाही. या देशासाठी फक्त संविधान हा एकमेव कायदा असेल असं घोषित करण्यात आलं. आपली, भारताची शक्ती प्रदर्शित करण्याहेतूने दिल्लीत मिलिटरी परेड होते. भारत सार्वभौमत्व देश आहे अशी आठवण यादिवशी, दरवर्षी केली जाते.
 
२६ जानेवारी रोजी सरकार कोण्या न कोणत्या देशाच्या राष्ट्रपती किवा पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवते. १९५० च्या पहिल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो होते. मागील वर्षी ब्राझीलचे राष्ट्रपती जेम्स बोल्सानारो यांना बोलावण्यास आले होते. या दिवसाचे निमित्त साधून वेगवेगळे पुरस्कार राष्ट्रपतींच्या ह्स्ते प्रदान केले जातात. यावर्षीही असाच दिवस कोरोनामुळे थोडी बंधने घालून साजरा होईल... पण भावना मात्र तीच असेल, हे निश्चित!
Powered By Sangraha 9.0