पीहू - मनाला चटका लावणारा एक चित्रपट

15 Jun 2020 10:00:00

तीन वर्षांची पीहू डोळे उघडल्यावर आईला हाक मारते....

मम्मा......मम्मा....

आई उत्तर देत नाही, इवल्याशा पावलांनी इतके-तिकडे भिरभिरते.... काहीतरी शोधत असते..... आपल्या बाहुली ला पाहून फार आनंदी होते.... डाळ्या वाजवत उड्या मारते....... मग लक्षात येतं पॉटी ला जायचं आहे पण आईविना कशी जाणार...... पुन्हा तुरूतुरू आईजवळ जाते.........

घरातलं सगळं सामान विस्कटलेलं आहे..... सगळीकडे फुगे लागले आहे....बहुतेक रात्री तिच्या वाढदिवसाची पार्टी झालेली असावी..... किचन मध्ये सामान इकडे-तिकडे पडलेलं आहे.... वॉशबेसिन चा नळ बंद केलेला नाही.....


pihu_1  H x W:

उषट्या-खरकट्या प्लेटा पडलेल्या आहेत... बेसिन जवळ कचऱ्याचे पैकेट तसेच पडलेले आहे...... एकीकडे रूम मध्ये टीव्ही सुरू आहे......... या अस्त-व्यस्त घरात तीन वर्षांची पीहू हिंडतेय.... कधी आईला कधी वडिलांना हाका मारतेय..... पण कोणीच उत्तर देत नाही.....

प्रेशर आलेलं आहे तिला पण टॉयलेट ला आई सोबत असते नेहमी, विचार करत असते पण काही इलाज नाही , आई आज झोपलीच आहे.... उठतंच नाहीये.....कशीबशी फ्रेश होते.... पाणी टाकता येत नाही.... साबणा पर्यंत हात जात नाही....... आणि ते येवढसं कोकरू...... तशीच जाते आईच्या खोलीत.... कपडे घालता येत नाही.... आईला मोठ्याने हाक मारत असते...... पण आई एक नाही कि दोन नाही.........

आता काय आईजवळ जाऊन तिला गदागदा हलवते..... तिच्या तोंडावर चापट्या मारते..... तर आईच्या तोंडातून पांढरा फेस निघत असतो..... हातातून एक गोळ्यांची बॉटल खाली पडते...... सगळ्या गोळ्या जमीनीवर पडतात....

ती चिमुकली त्या गोळा करण्यात गुंग होते.... झालेला प्रकार तिला कसा कळणार??? आईच्या संपूर्ण अंगावर हिरवे-निळे डाग असतात. वडिलांनी मारझोड केल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत असतात...... पण ती निरागस पोर आपल्याच विश्वात रमलेली असते......

एक गोळी तोंडात टाकून बघते.... ती कडू लागते..... मग आपल्या मृत पडलेल्या आईशी गप्पा मारत असते.... तिचं क्रीम- पावडर आणते, तिच्या तोंडाला लावते..... लिपस्टिक लावते.... आणि अत्यंत प्रेमानी आणि हळुवार पणे तिचे केस कुरवाळत असते......



आता भूख लागल्या सारखं वाटतं.... मग काय???? किचनमध्ये जाऊन बघते तर ओटा पसरलेला असतो.... हात पुरत नाही.... खायला काहीच मिळत नाही...

मोठ्या मुश्किलीने स्टूलावर चढून एक डबा काढते , त्यात दोन शिळ्या पोळ्या असतात..... माइक्रोवेव मध्ये गरम करायला जाते तर त्या जळून खाक होतात.... मग काय रात्रीच्या उष्ट्या प्लेटा पडलेल्या असतात.... त्यात नूडल्स , पिझ्झा , बर्गर सगळं दिसतं, तेच उचलून आणते.... आईच्या डोक्याशी बसते आणि स्वता पण ते फेकलेलं अन्न खाते आणि आईला पण भरवायचा प्रयत्न करते.....

जशी-जशी कहाणी पुढे वाढते आपल्याला लक्षात येतं कि आई-वडिलांचा वादा मुळे त्या चिमुकलीचं सगळं नष्ट झालेलं असतं, घराचे हाल.... पाणी वाहतयं, गीझर चालू, प्रेस च बटन चालू, इलेक्ट्रिक चे सगळे स्विच ऑन असतात..... सामानची नासधूस झालेली असते आणि 

या 3 वर्षांचा पीहूचं जगच संपलेलं असतं.....

भुकेने व्याकुळ ते लेकरू जेव्हां आईच्या बॉडीजवळ जाते तिच्या छातीला वारंवार हलवून खूण करते कि दूध हवयं तेव्हां काळीज तोंडाशी येतं..... काय त्या स्त्रीची विंडबना..... कित्ती सोसलं असणार तिने??? आपल्या निष्पाप लेकराला एकट टाकून जाण्याचं बळ यामुळेच तिच्या अंगात आलेलं असतं......

शेवटी पीहू एकटीच सगळीकडे वावरत असते.... गैलेरीत जाते..... तिथून खाली वाकून शेजारच्यांना बोलवण्याचा प्रयत्न करते, पण तिचा तो चिमणीसारखा आवाज कुणालाच ऐकू जात नाही.....

कधी फ्रिज़ मध्ये जाऊन बसते तर कधी आईचं मेकअप किट उघडून सगळं लावत असते....

वडिलांचा फोन येतो.... पण ती "मम्मा निन्नु" या उपर काही सांगू शकत नाही.... वडिल आईला टोमणे मारायला फोन करत असतात.... तू मेलीस तरी परवाह नाही असं बोलत असतातं , पण या सगळ्यांपासून बेखबर "पीहू" घर-घर खेळत असते.....

शेवटी शेजारच्यांना कळतं कि काही गडबड आहे, तितक्यात पीहू चे बाबा पण घरी येतात.... मग दार तोडून आत येतात आणि बघतात तर सगळं नष्ट झालेलं असतं....स्विच ऑन राहिल्याने सगळीकडे आग लागून काळे डाग पडलेले असतात.... बायको ची डैडबॉडी पलंगावर पडलेली असते..... आणि पीहू......

ती पलंगाखाली घर-घर खेळण्यात गुंग असते.......


pihu_1  H x W:


हा चित्रपट पाहिला आणि अक्षरशः रडू आलं, त्या स्त्रीचं जखमांने भरलेलं शरीर... त्या झोपेच्या गोळ्याखाऊन आत्महत्या करणं.... ती निरागस पोर...... सगळं-सगळं मनाला भेदणारं होतं, त्रास झाला फार असं पाहून...

आज कित्तीतरी घरांमधून ही सत्यस्थिती आहे.... कित्तीतरी स्त्रियां हा अत्याचार सोसून राहिल्या आहे...... नवरा-बायकोंमध्ये होणारी भांडणं आणि वाद-विवाद हे विकोपाला जातं मग नवरा आपली शक्ती दाखवायला बायकोशी मारहाण करतो.......

पण..... पण त्या कोवळ्या, निरागस मुलांच काय??? जे आई-बाबांचं हे भांडण दारामागून बघत असतात.....

कित्ती वाईट परिणाम होतो त्यांचा मनावर..... कल्पना करू शकतो का आपण???

तीन वर्षांची ती पोर आपल्याला हे सगळं पटवून देते....आई-वडिलांचा वादात मुलांचा कसा बळी पडतो हे या चित्रपटातून स्पष्ट होतं.....

पीहू मायरा विश्वकर्मा नावाच्या या मुलीनं "पीहू" हे पात्र उत्तम साकारलयं, तिचे ते बोलके डोळे ते गोड़ हास्य या चित्रपटात जिवंतपणा ओततात..... एका क्षणाला असं वाटू लागतं जसं हे आपल्याच जवळपास किंवा शेजारची गोष्ट आहे....."घरेलू हिंसा" हा गुन्हा आहे त्या साठी शासन ही केलं जातं, हे माहिती असून सुद्धा आज कित्तीतरी अशी घरं आहेत जिथे बायकोला मारहाण किंवा बळजबरी, सतत् टोमणे मारणं , सासरच्यांनी अत्याचार करणं हे सुरू आहे....

"पीहू" हा एक चित्रपट अश्या सगळ्यांना दिलेला एक चटका आहे..... जेव्हा आपण त्या निरागस पिल्लाची धडपड बघतो तेव्हां लक्षात येतं कि अशा वागण्यानी मुलांवर काय आणि किती परिणाम होतो.........

- प्रगती गरे दाभोळकर


Powered By Sangraha 9.0