प्रिय बापूस...

02 Oct 2020 15:13:28
bapu_1  H x W:
 
प्रिय बापूस,
 
बापू महात्मा तू म्हणाला होतास या देशातल्या जनतेने एक वेळ थुंकले तर तयार होणाऱ्या महा पुरातून गोरी घातकी कातडी पार बुडून जाईल ....पण कापल्या करंगळीवर हि न मुतनाऱ्यांच्या जातीला हे सुचणार कुठून ??? तू जसा विरोधकांना समजाला नाहीस, कारण तू त्यांना पचणारच नव्हतास, का तर तू त्यांना नेहमी खरे बोलायला सांगत होतास, अन्याय सहन करू नका म्हणालास, दिवसाला तीन टाईम जेवणारयांना तू उपोषण करायला सांगत होतास, सर्वांशी प्रेमाने वागा म्हणालास मग तू यांना कसा आवडणार ??
 
आणि जे तुजे अनुयायी त्यांच्या बद्दल काय सांगू ??? त्यांना तर तू लोकांना कधीच समजू नये आसाच वाटतोस, तुजे विचार जर लोकांना कळले तर सगळ्यात आधी लोक यांच्याच ढुंगणावर लाथ नाही का घालणार! आणि मग त्यांचं तुझ्या नावाने दुकान कसं चालणार! अशी त्यांची आडचन आहे .....
 
तुझी चूक इतकीच झाली... तू ब्यारीष्टर होऊन आल्या वर वकिली करून बक्कळ पैसा कमवायला हवां होतास!! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दिल्लीत जावून मिरवाय च सोडून नाव्खालीला दंगे थांबवायला गेलास. काय गरज होती त्याची?? स्वता पंतप्रधान, राष्ट्रपती... नाहीच तर गेल्या बाजारी आपल्या पोरग्याला तरी मंत्री करायचं होतास किमान पक्षी नाही तर एकादा कारखाना एजन्सी तरी...
 
आणि हो राहिले लाल बहादूर शास्त्री जी ची, ते स्वतः तुलाच गुरु मानत पण त्यांचा आनुयायीना मात्र वर्षात कधी नाही पण आज तुलना करावी वाटते... त्यांचेच काय समस्त भक्त गण जमातीला आप आपल्या नेत्यांची उंची मोजायला तुझीच फुटपट्टी लागते!
 
#लव्हयुबापू आणि #शास्त्रीजी....हॅप्पी बड्डे #जयजवानजयकिसन
 
 
 
- मंगेश बेंडखळे 
Powered By Sangraha 9.0