हे देवा.. !!! सेव्हिंग्स…!!!!
सेव्हिंग्स म्हटलं की टेंशनच येतं. आपण जितकं कमवतो, त्यातील निम्म्याहून अधिक पैसा या किंवा त्या खर्चात जातो, आणि शेवटी हातात कधी कधी काहीच नाही तर कधी कधी अगदी थोडी रक्कम उरते. त्यातून मोठ्या शहरांमध्ये नोकरी असेल तर पगार जास्त असला तरी खर्च देखील जास्तच असतात. मात्र त्यातूनही आपण जर थोडंसं प्लानिंग केलं तर सेव्हिंग्स नक्कीच करु शकतो.
नोकरीच्या सुरुवातीला सेव्ह कसं करावं हा मोठाच प्रश्न असतो. अनेकदा नवीन नवीन कमवण्यात मजा येते, आणि मग आपल्याला हवं ते घेण्याचं फ्रीडम मिळाल्यामुळे कधी कधी अवाजवी खर्च देखील होतो. तो टाळण्यासाठी We csn plan it in advance and then we will have a good amount in our account.
How to plan savings?
सेव्हिंग्स प्लान करण्यासाठी थोडंसं मॅनेजमेंट म्हणजेच नियोजन हवं :
१. पगार झाल्यावर १० टक्के रक्कम बाजूला काढा :
पगार झाल्या झाल्या त्यातील १० टक्के रक्कम दुसऱ्या खात्यात किंवा, वेगळी काढून ठेवा, आणि विसरून जा त्या रकमेबद्दल. दर महिन्यात असे करण्याची सवय झाली की, गरज असताना एक मोठी रक्कम आपल्या हाताशी असेल. अनेकदा मित्र मैत्रीणींना, आई वडिलांना काहीतरी गिफ्ट देण्यासाठी, अचानक ट्रिप प्लान झाली तर त्यासाठी, रिझर्वेशन्स साठी ही रक्कम वापरता येऊ शकते.
२. एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट :
आजच्या काळात सगळं जग टेक्नोसॅव्ही झालं आहे, त्यामुळे बँकेत न जाता देखील आपल्याकडे सेव्हिंग्सचे अनेक ऑप्शन्स आहेत. एसआयपी म्हणजे स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये आपण विचार करुन, तज्ज्ञांकडून, बँकेकडून मार्गदर्शन घेऊन इन्व्हेस्ट केलं की एका वेळेनंतर आपल्याकडे छान सेव्हिंग तयार होतं. बचत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणून एसआयपी कडे बघितलं जातं. मात्र अशी गुंतवणूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे अत्यावश्यक आहे.
३. घरीच नवीन नवीन पदार्थ करुन खाणे :
घरापासून लांब राहून नोकरी करणाऱ्या अधिकांश मुला मुलींची कहाणी म्हणजे भूक लागल्यावर बाहेरचे खाणे. अनेकदा काही मित्र आपसात जोक देखील मारतात की आयुष्यातली अर्धी कमाई कुठे गेली तर मी म्हणेन हॉटेलमध्ये. तर तसे होऊ नये यासाठी घरच्या घरी नव नवीन पदार्थ करुन खाणं खिशाला जास्त परवडण्यासारखं आहे. यामुळे स्वयंपाक देखील जमतो आणि मुख्य म्हणजे हवं ते खाता ही येतं.
४. मोठी रक्कम मिळाल्यावर ताबतडोब एफडी करणे :
अनेकदा बोनस किंवा प्रमोशनच्यावेळी मोठी रक्कम हातात येते. अशी रक्कम तशीच अकाउंट मध्ये राहीली तर ती खर्च होते, आणि मग नंतर वाटतं असे मोठी रक्कम होती खर्च झाली. ते टाळण्यासाठी अशी रक्कम हाती आल्यावर त्याचे लगेच फिक्स्ड डिपॉझिट करावे. यामुळे एका मोठ्या काळासाठी आपला पैसा सुरक्षित राहतो, व्याजदरामुळे अधिक पैसा मिळतो, तसेच असा पैसा खर्च होत नाही.
५. डिसिप्लिन म्हणजेच शिस्त :
स्वत:च आपण स्वत:ला शिस्त लावणं खूप महत्वाचं आहे. एकदा सेव्हिंग्सचं रुटीन सेट झालं की ते छान चालतं, मात्र सेट करे पर्यंत आपली परीक्षा असते. त्यामुळे सेव्हिंग्सच्या बाबतीत आपण डिसिप्लिंड वागलो तर आपलं सेव्हिंगही छान होऊ शकेल.
तर दोस्तहो… !!! मलाही सेव्हिंग्स करणं कठीण जातं. अनेक टेम्पटिंग गोष्टी दिसतात, मात्र Planning is the key. I hope these points will be helpful for you to save a good amount of money. All the best :)