वेड लावणारी मोस्टली सेन

 
 
 
तुमच्या पैकी ८०-९० % लोक यूट्यूब रेग्युलर फॉलो करतच असाल. त्यामुळे हे नाव काही तुम्हाला नवीन नाही. प्राजक्ता कोळी आणि मोस्टली सेन हे म्हणजे शरीर आणि आत्मा असं नातं. २६ वर्षांची एक तरुणी जिने अक्षरश: १४-३० या वयोगटाला वेड लावलं आहे. तिचं यूट्यूब चॅनल आहे, आणि त्याचं नाव आहे “मोस्टली सेन”. ‘अमेझिंग डिजीटल कंटेंट’ या श्रेणीत तिचं हे चॅनल येतं.
 
 
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तिचे व्हिडियोज येतात. आणि आता पर्यंत तिच्या चॅनलला 4 मिलियन हून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. ४ मिलियन लोकं तुम्हाला फॉलो करतात, म्हणजे कित्ती भारी नाही का? तिच्या कंटेंटची खासियत काय आहे माहिती? तिचा रियलिस्टिक अप्रोच. ती जशी आहे, तशीच ती कॅमेऱ्यासमोर असते. म्हणजे बघणाऱ्यासातरी असंच वाटतं. चंचल अशी प्राजक्ता कॅमेऱ्या समोर देखील तशीच दिसते. एकदम फ्रेश. तिला तिची डबल चिन किंवा आलेला एखादा पिंपल लपवावासा वाटत नाही, ती फेसपॅक लागलेल्या चेहऱ्याने कॅमेऱ्यासमोर डान्स करते. तिचे इंस्टा अकाउंट बघितले कि तुम्हाला कळेलच.

 
 
तिचे आई, बाबा आणि लहान भाऊ मोंटू अशी तिची ही ‘फिक्शनल डिजीटल फॅमिली’ आहे. गंमत म्हणजे ती स्वत:च या सगळ्या भूमिका साकारते, आणि तिचे व्हिडियोज धमाल असतात. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन ती अनेकदा वाचनासाठी प्रेरित करते. वेगवेगळ्या पुस्तकांचे फोटोज टाकून, ती स्वत: पुस्तक वाचतानाचे फोटोज टाकून तिने अनेकांना वाचनाचेही वेड नक्कीच लावले असणार.
 
 
 
 
 
 
 
तिचे व्हिडियोज असे मला शब्दात नाही मांडता येणार. ते बघावेच लागतात. त्यासोबतच तिचे इंस्टा अकाउंट, व्ही लॉग्स, हे सगळंच नक्कीच बघावे असे आहे. एक २६ वर्षांची मुलगी यूट्यूबच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरते, अनेक समस्यांवर अनेक issues वर ती तिच्या चॅनलच्या आणि टॅलेंटच्या माध्यमातूनल आवाज उठवते, स्वत:च्या रोजच्या आयुष्यातून अनेक युवांना ती अनेक गोष्टींसाठी कळत न कळत इंस्पायर करते, अशा या मोस्टली सेनचे व्हिडियोज एकदा तरी नक्कीच बघा.