Broken but beautiful 2 : एका प्रेमाची दुसरी गोष्ट

25 Dec 2019 13:00:00

Broken but beautiful_1&nb
वीर आणि समीरा आता एकामेकांपासून लांब चालले आहे , कारण समीरा या नवीन नात्यासाठी तयार नाही , तिच्या मनावर अजूनही दुभंगलेल्या नात्याचं दडपण आहे, या नात्यात तसचं काही झालं तर?? वीर कार्तिक सारखा वागला तर??
 
हे "बैगेज" मनात ठेवून ती वीर ला टाळते आणि वेळ मागण्याचा फाजील बहाना करते , आणि यानंतर सुरू होतो दोघांचा नवीन प्रवास.
 
पहिल्या एपिसोड ला आपल्याला दिसतं कि वीर ते घर आणि शहर सोडून चाललाय, समीरा चा नकार आल्यानंतर त्याला "एलिना" चं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्या साठी तो बंगलौर ला जाऊन "वाईन" तयार करायचा नवीन पद्धती शिकणार आहे , मनात एकदा पुन्हा अपयशी ठरल्याचं दुःख आहे पण अहंकार दुखावला आहे. या सगळ्यात त्याला भेटते एक अत्यंत सुरेख पण तेवढीच हुशार "डैबी". ही अत्यंत प्रोफेशनल मुलगी आता वीर ला त्याचा नवीन कामात मदत करते आणि हळुहळू त्याचा जीवनातही प्रवेश घेते . डैबी ला काम आणि पैसा महत्वाचा वाटतो पण वीर ला फक्त प्रेम , त्याचा मनातून "एलिना" ला मुक्ती मिळाली आहे पण कोणत्या तरी कोपऱ्यात समीरा चिकटून बसली आहे, कारण फक्त समीरा मुळे तो आपलं आयुष्य जगतोय , केवळ तिच्या मुळे त्याचा मनातील नैराश्य, न्यूनगंड, आणि विफलता बाहेर पडून तो एक सामान्य माणसा सारखा वावरू शकतोय.पण एक दुःख त्याला सतत् पोखरतय आणि ते म्हणजे दोन मुलींना गमवायच दुःख, त्याला सतत् असं वाटतय कि तो आपल्या वाईट स्वभावामुळे कुठेतरी कमी पडला , आणि पहले एलिना मग समीरा त्याचा आयुष्यातून निघून गेली , म्हणून च तो स्वतः ची काळजी न करता , आपला जीव धोक्यात टाकून सुद्धा "डैबी" ला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते करतो, अति प्रेम , अति उत्साह आणि अति काळजीने डैबी ला हाताळतो , पण डैबी च्या मनात वीर बद्दल तस काहीच नसतं उलट तिला त्याचा अश्या वागण्याचा त्रासच होत असतो.
 
अलीकडे समीरा एक बिनधास्त मुलीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करते आहे , आता तिला एकटेपणा ची , लिफ्ट मधून जाण्याची तसेच बंद खोलीची भिती वाटत नाही , तिला "पैनिक अटैक" येणं आता बंद झाले , या सगळ्यात तिची मदत तिचे "साइकायट्रिस्ट" डॉ.बत्रा करतात.
 
 
 
आता ती खळखळून हसते, गप्पा मारते, पाणीपुरी खाते आणि कोणालाही आपल्या जवळ करत नाही , हे सगळं तिला वीर नी शिकवलेलं असतं, जरी तो तिला "सायको एक्स" अशी हाक मारतो तरी प्रत्येक प्रसंगाला सामोरी जायला तिला मदत करतो आणि तिच्यात आत्मविश्वास आणतो , ह्याच सगळ्या कारणांमुळे तिला वीर ला विसरणं अशक्य असत आणि हे डॉ बत्रा चा पण ध्यानात येतं.
 
अश्यातच कहाणी पुढे वाढते आणि एक नवीन पात्र आपल्या डोळ्यासमोर येतं , तो म्हणजे "आहान" समीरा चा बालमित्र, हा तिच्या मैत्रीणीचा भाऊ आहे आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा सोबती पण. एक अत्यंत प्रेमळ, पण निर्णयाचा पक्का, अतिशय विनोदी पण प्रेमाच्या बाबतीत फार खंबीर, समीरा साठी काहीही करायला तयार असा द्रुढनिश्चयी व्यक्ती असतो, वेगवेगळ्या गर्लफ्रेंड सोबत राहण्यापेक्षा एकीशी लग्न करून मोकळं व्हायचं अश्या भक्कम विचारांचा हा "आहान" प्रत्येक प्रकारानी समीरा ला आपलसं करायचा प्रयत्न करतोय , तिची काळजी घेणं, अत्यंत जिव्हाळ्याने तिच्या साठी वेगवेगळे पदार्थ बनवणं , असं सगळ करून समीरा ला लग्नासाठी तयार करणं हाच त्याचा ध्यास आहे , एकीकडे वीर आणि डैबी लग्न करायला सज्ज झाले आहे , पण म्हणतात ना "मेरे मन कछु और है विधिना के कछु और" तसंच काही घडतं , आणि समीरा पुन्हा एकदा वीर चा जवळ नकळत येते आणि अघटित असं काही घडतं ज्याने ते दोघे सोबत येतात , पण आता ते एकटे नाही , त्या दोघांचे प्रेमी त्यांच्या आयुष्यात आहे , पण ही नकळत झालेली दुर्घटना सगळ बदलून टाकते , वीर आपलं लग्न मोडून टाकतो पण समीरा चा नावाला धक्का लागू देत नाही , इकडे "आहान" चं वेडं प्रेम समीरा ला या अपराधासकट स्वीकारतं आणि ते दोघे लग्नाचा निर्णय घेतात, दुर्दैवाने वीर आणि डैबी च्या रिसॉर्ट वर हे लग्न पार पडत परंतु समीरा चा वागणूकीत झालेला फरक आहान ला जाणवतो, त्याला कळतं कि वीर च अशणं आणि नशणं समीरा ला किती टोचतं , आणि मग तो लग्नाच्या दूसर्या च दिवशी समीरा ला वीर कडे पाठवून देतो, कारण त्याला ही जाणीव झालेली असते कि समीराच्या मनात फक्त वीर आहे, असा या मालिकेचा शेवट होतो, अत्यंत मार्मिक , थेट मनाला भिडणारे संवाद , भरभरून केलेलं प्रेम , अत्यंत भावनिक अशे द्रुश्य डोळ्यात पाणी आणतात , तसेच मधुर संगीताची जोड त्यंच्या प्रेमाला चार चांद लावते , आहान ही अशी एक व्यक्ती आहे ज्याला पाहिल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही , अग्नी -ऋतूपोर्नो-समीरा ही बेमिसाल तिकडी तुम्हाला आपल्या पक्क्या मैत्रीणींची आठवण करून देईल , ही मालिका पाहतांना तुम्ही पुन्हा एकदा वीर आणि समीरा च्या प्रेमात पडाल ही खात्री आहे , तर एकदा आवर्जून बघा ....

- प्रगती नीलेश दाभोळकर 
Powered By Sangraha 9.0