डायस मीडिया आपल्या वेगवेगळ्या वेबसीरीजसाठी खूप प्रसिद्ध आहे. अडल्टिंग, वॉट द फोक्स किंवा लिटिल थिंग्स या सगळ्याच वेब सीरीझ खूप प्रसिद्ध आहेत. आणि याच लिस्ट मध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे 'ब्रोचारा' | रोजचं आपण हाय ब्रो, हाऊ आर यू ब्रो, जाने दे ना ब्रो हे शब्द अगदी नकळत वापरत असतो. आपल्या लक्षातही येत नाही आणि हे फ्रेजेस वापरले जातात. तर आपल्या अगदी घट्ट अशा फ्रेंडसर्कल सोबत आपलं असलेलं नातं म्हणजे ‘ब्रोचारा’.
या वेबसीरीझ मध्ये देखील अशीच एक चौकडी दाखवण्यात आली आहे. गंमत म्हणजे ही आता पर्यंत आलेल्या सर्व वेबसीरीझपेक्षा वेगळी आहे कारण ही पहिली ‘मेल बेस्ड वेब सीरीझ’ म्हणजेच केवळ पुरुषांवर त्यांच्या आपसातल्या मैत्री वर आधारित वेब सीरीझ आहे ज्यामध्ये मुख्य नायिकाच नाहिये. संपूर्ण कथा चार मित्रांच्या आयुष्याच्या अवती भवती फिरते. चौघेही लॉंग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आहेत, आणि एकत्र राहतात, एकत्र एका ऑफिसमध्ये काम करतात. आणि मुंबई आणि मुंबईच्या लाईफस्टाइलच्या अवतीभवती ही कथा फिरते. हे चौघच असतात एकमेकांना, एकमेकांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्सला डील करण्यासाठी. एकूणच हा ‘ब्रोचारा’ खूप इंटरेस्टिंग आहे. या वेबसीरीझचे ५ ही एपिसोड्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
या वेबसीरीझमध्ये आपल्या सगळ्यांचाच लाडका अमेय वाघ आहे. कनन नावाची भूमिका त्याने मस्त वठवली आहे. एक अतिशय चीझी असा नवरा जो आपल्या बायकोला पम्पू अशी हाक मारतो. पहिल्या एपिसोड पासूनच त्याला बघायला खूप मज्जा येते. या शिवाय लिटील थिंग्स फेम ध्रुव सेहगल याने देखील एक महत्वाची भूमिका यामध्ये साकारली आहे. या दोघांसोबतच वरुण तिवारी आणि सयनदीप सेनगुप्ता हे दोघे या ब्रोचाऱ्याचे आणखी दोन पिलर्स आहेत. या वेबसीरीजचे दिद्गर्शन केले आहे सिमरप्रीत सिंह तर लेखन केले आहे, हिमांशु चौहान आणि गिरीश जोटवानी यांनी. अमेय वाघचा अभिनय बघण्यासाठी, एँजॉय करण्यासाठी खास ही वेब सीरीझ बघावी. साधारण १६ मिनिटांचा एक एपिसोड असल्यामुळे Its Quick and entertaining.
एकूणच तुम्ही या ब्रोचारामधला ब्रोमँस फुलटू एँजॉय करु शकता. आणि trust me this one is really super interesting. तो फिर ब्रोचारा देखेगा ना ब्रो?
- निहारिका पोळ सर्वटे