एक अत्यंत सामान्य भासणारी असामान्य प्रेमकथा : Broken but Beautiful

16 Dec 2019 18:13:31


Broken _1  H x

 


आजच्या या आधुनिक काळात तरुण पिढी शिक्षणा निमित्त, व्यवसाय किंवा नोकरी करायला आपल्या घरापासून , आई वडिलांपसून फार लांब वेगवेगळ्या शहरात राहत असतात, एकटे राहण्याचे धाडस, आत्मविश्वास आणि सतत् काहीतरी नवीन किंवा मोठं करण्यासाठी ही पिढी दिवसरात्र झटत असते, या अश्या स्थितीत त्यांना जर कोणी जवळचं असतं तर ते फक्त त्यांची मित्रमंडळी. परंतु आजच्या या आधुनिक युगात मैत्रीपलीकडे पण एक नातं आहे आणि ते म्हणजे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड च नातं.

 


ही कथा अशाच एका जोडप्याची आहे , "वीर आणि समीरा"


वीर हा अत्यंत भावनिक , संवेदनशील आणि तापट असा मुलगा आहे , ज्याने आपल्या कामाच्या नादात , हलगर्जीपणा मुळे आपल्या बायकोला म्हणजे "एलिना" ला एका अपघातात गमावले आहे, आणि आता त्याच अपघाता साठी स्वतःला दोषी ठरवून मोकळा झाला आहे. या अपराधबोधात जगत तो स्वतःला आणि त्या अनुषंगाने जवळपासच्या लोकांना सुद्धा त्रास देतोय.


एकीकडे समीरा आपल्या दोन जिवलग मैत्रीणींसोबत राहतेय आणि आपल्या भंगलेल्या प्रेमाला चिकटून त्याचा बाऊ करून बसलीये. तिला आपल्या बॉयफ्रेंड कार्तिक चा सतत् पाठलाग करून एकदा पुन्हा त्याला आपल्या प्रेमात पाडायचे आहे , असे हे दोघे आपपल्या आयुष्यात अशक्य गोष्टींसाठी प्रयत्नशील आहे

 

अशा या विलक्षण परिस्थितीत नियती दोघांना अमोरासमोर आणते, एक अपघात दोघांची भेट घडवतो , आणि त्यनंतर बऱ्याच कारणांमुळे दोघे एकमेकांसमोर येतात पण ओळख पटते ती कार्तिकच्या फ्लॅटवर वीर राहायला जातो तेव्हां. तो फ्लॅट खरतरं कार्तिक आणि समीरा दोघांचा असतो पण समीरापासून सुटका व्हावी म्हणून कार्तिक तो फ्लॅट वीर ला रहायला देतो आणि तिथून सुरू होते एक विचित्र पण हळवी प्रेमकथा.वीर एका विचित्र मानसिकतेत जगत असतो , तो कोणत्याही घटनेला फार उत्तेजीत होऊन हाताळतो, आपल्या गेलेल्या बायकोचे भास त्याला सतत् होत असतात तो तिच्याशी तासनतास गप्पा मारत असतो, त्याला तिच्याशिवाय जगताच येत नाही असं म्हणणं काही वावगं नाही , स्वतःला त्या अपघाता चा दोषी मानून , सतत् एकट राहयचं, कोणालाही जवळ येऊ द्यायचे नाही ,हेच त्याचं जीवनाविषयी सूत्र. अलीकडे समीरा च्या जीवनात कार्तिक एके कार्तिक असतो , त्याचा शिवाय आयुष्यात काही असू शकतं असं तिला वाटतच नाही , त्याने तिला सोडून दूसर्या मुलीचा हात धरला आहे हे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करते ती , तो तिचा राहिला नाही यावर तिचा विश्वासच नाही ती रोज एक नवीन बहाना शोधून कार्तिक जवळ जायला पाहाते आणि कार्तिक प्रत्येक वेळी तिला धुडकावून लावतो.या अनुषंगाने समीरा वीर चा वापर कार्तिक ला परत मिळवण्यासाठी करते , वीर पण तिला वेडी समझून साथ द्यायला तयार होतो , पण हे दोघे अगदी एकसारखे आहे हे त्यांना स्वताला कळत नसतं आणी हे नाटक करता-करता दोघे नकळत एकामेकाच्या प्रेमात पडतात , वीरचा काळजी करण्याचा स्वभाव , आपुलकी , जिव्हाळा , प्रेमाला जिवापाड जपणं, आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहणं समीरा च्या मनात खोलवर रुतत जातं , तसंच समीरा चा हळवा स्वभाव , प्रेमासाठी मनात असलेलं गांभीर्य , निश्चय हे सगळे गुण वीर ला तिच्या जवळ नेतात ,पण दोघांच्या मनात असलेली भिती त्यांना प्रेम स्वीकारण्यापासून विमुख करत असते , दोघांची मानसिक अवस्था , एकदा गमावलेल प्रेम , हरवलेल नातं या प्रेमाला आडवं जात असतं , मनात प्रेम असूनही ते स्वीकार करण्याची ताकद त्यांचात नसते.त्यांना या नवीन नात्याला समझून घ्यायला वेळ हवा असतो , आणि ते वेळेचा बहाणा करून आपला भितरेपणा लपवायला एकामेकांपासून दूर चालले जातात.


या कथेतील संवाद , उभारलेलं चित्र , भावना नकळत तुमच्या मनापर्यंत जाऊन पोहचतात, नात्यंची हळूवार केलेली गुंतवणूक, अलगद केलेले स्पर्श , जिव्हाळा , भ्रमात पडलेल मन , आपल्याला आपलीच आठवण करुन देतं , ते जवळ येणं , खांद्यावर डोकठेऊन रडणं , अश्रू , कुशीत घेणं , त्या अनावर झालेल्या भावना , तो उद्वेग सगळच मनाला मोहरून टाकणारं आहे , वीर आणि समीरा ला पाहतांना प्रत्येक प्रेमात पडलेलं मन स्वताला त्या जागी बघतं आणि नकळत दोन अश्रूबिंदू पापण्यांवर तरळतात.

ही वेब सीरीज ऑल्ट बालाजीवर उपलब्ध आहेय यामध्ये मुख्य भूमिकेत विक्रांत मेस्सी आणि हरलीन सेठी आहेत.  आणि या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे, संतोष सिंह यांनी केले आहे. एकदा तरी नक्की बघावी अशी ही वेब सीरीज आहे.  या वेब सीरीजची गाणी देखील खूप सुरेख आहेत, ही गाणी बॉलिवुडचे प्रसिद्ध गायक आणि गायिका म्हणजे श्रेया घोषाल, पापोन, अरीजीत सिंह यांनी गायले आहेत.  

- प्रगती नीलेश दाभोळकर


Powered By Sangraha 9.0