भन्नाट भटकंतीची तयारी..

23 Nov 2019 11:00:00


 

(Picture courtesy : Sampada Deshpande) 

भटकायला कुणाला आवडत नाही? वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तिथले वेगवेगळे पदार्थ, भरपूर फोटोज, आणि आयुष्यभरासाठी घेतलेला एक मस्त अनुभव. या सगळ्यासाठी वर्षातून एकदा का होईना मात्र अशी भटकंती केलीच पाहीजे. काही लोक दर आठवड्यात जवळपास कुठेतरी किंवा महीन्यातून एकदा.. किंवा ४-६ महीन्यातून एकदा फिरायला जातात. आणि काही भन्नाट ट्रॅव्हलर्स.. फिरण्यालाच आपलं करिअर किंवा आपल्या जगण्याचं मुख्य ध्येय बनवतात. ते काहीही असलं तरी या भन्नाट भटकंतीसाठी एक तयारी ली लागतेच. सामान्य लोक जेव्हा फिरायला जातात, त्यावेळी त्यांना फिरायला जाताना काय तयारी करायला पाहीजे किंवा भटकंतीला जाण्यासाठी काय काय करावं या बद्दल आज आपण गप्पा मारू.

तर फिरायला जाणं म्हणजे बजेट हे आलंच, आधी बजेट मग त्यानंतर तारखा ठरवणं, मग त्यानंतर शॉपिंग, मग तेथील हवामान, अशा अनेक गोष्टींबद्दल फिरायला जाताना विचार करावा लागतो. जसं की,



खर्च किंवा बजेट : फिरायला जाणं म्हणजे खर्च हा आलाच. आणि खरं सांगायचं तर माणसाने हा खर्च करायला देखील हवा. म्हणजे अगदी अव्वा च्या सव्वा पैसे खर्च करुन जायचं का तर नाही? आधी पासून प्लॅन केलं तर बजटमध्ये एक मस्त ट्रिप ठरवता येऊ शकते. मित्रांसोबत जायचं असेल तर खर्च तसाच डिव्हाइड होतो, मात्र सोलो ट्रिप किंवा कपल ट्रिप असेल तर तसं सेव्हिंग आधी पासून करावं लागतं. त्यासाठी दर महिन्यातील सॅलेरी किंवा पॉकेटमनीमधून एक ठराविक अमाउंट ‘ट्रिप फंड’साठी वेगळे काढून हवं तेवढं अमाउंट जमा झालं कि ट्रिप प्लॅन करता येऊ शकते. तसेच बजेट ट्रिपसाठी आधीपासून ट्रेन किंवा फ्लाइट बुक केल्यास ते स्वस्त पडतं, सोलो ट्रिप असेल तर हॉस्टेल्स किंवा एअर बीएनबी स्टे परवडतात. फक्त प्रत्येक हॉटेलची विशेष चौकशी करून मगच बुकिंग करावं. प्लॅन केलं तर सर्व परवडतं. You can afford any trip until you plan it properly. 
 
 
हवामानाची चौकशी : जिथे जायचे असेल, तिथले हवामान आपण जाणार त्या तारखांमध्ये कसे आहे? पाऊस तर नाही ना? याची चौकशी करणे अत्यावश्यक आहे. कारण त्या हिशोबाने ट्रिप ठरवणे, ट्रिप साठी गरम कपडे किंवा छत्री, किंवा रेनकोट ठेवणे, हवामान खराब असल्यास ट्रिप वेळेत पोस्टपोन करणे असे काही करता येऊ शकते. हवामानाची चौकशी आपल्याला प्रत्येका परिस्थिती साठी तयार ठेवते. 
 
 
 

पॅकिंग : भटकंतीसाठी निघताना पॅकिंग सगळ्यात महत्वाचं असतं. आपण किती दिवांसाठी जातोय त्यानुसार कपडे, त्यासोबतच काही एक्स्ट्रा कपडे, आपल्याला लागणारे असेंशिअल्स, औषधं, स्लिपर्स, बीच किंवा स्विंमिंगपूल असेल तर स्विमिंग कॉस्ट्यूम हे सगळं तर आपण ठेवतोच, मात्र त्यासोबतच न्यूजपेपर, टिश्यू पेपर, एक डायरी आणि पेन, कापडी पिशव्या आणि स्वत:ची पाण्याची बाटली हे सदैव आपल्यासोबत असायला हवं, याची कधी आणि कधी गरज पडेल सांगता येत नाही. सोबतच कापडी पिशव्या आणि पाण्याची बाटली ठेवल्यास प्रदूषणही कमी होतं. 

घरचे खाद्य पदार्थ : आता बाहेर फिरायला जातोय म्हटल्यावर तिथल्या खाद्य पदार्थांची चव घेणं, नवीन क्युझिन ट्राय करणं हे असतंच मग हे उगाच का बाळगायचं, असं अनेकांना वाटू शकतं. मात्र अनेकदा स्पेशली इंटरनॅशनल ट्रिपमध्ये वेगळ्या देशाच्या खाद्य पदार्थांची चव न आवडणे, किंवा त्रास होणे असं होवू शकतं, त्यामुळे घरी केलेला चिवडा, लाडू, शंकरपाळी, ड्रायफ्रूट्स, थेपले असं बरंच काही आपल्याला कॅरी करता येऊ शकतं. माझी आई नेहमी म्हणते आपला तहानलाडू - भूकलाडू आपल्या जवळ नेहमी असावा. 
 

 
 

महत्वाच्या सामानासाठी हँडी पाऊच : इंटरनॅशनल प्रवास करताना आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे पासपोर्ट, तसेच आपल्या हॉटेलच्या बुकिंगची महत्वाची कागपत्र आणि इतर ओळखपत्र. ह सर्व एका ठिकाणी असावं, यासाठी एक हँडी पाऊच कॅरी करावा, आणि त्याची जीवापाड काळजी घ्यावी कारण परदेशात आपल्याला काहीही अडचण आल्यास याच कागपत्रांच्या जोरावर आपण मदत मिळवू शकतो. त्यामुळे हा पाऊच महत्वाचा आहे. 

या शिवाय अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. जसे की जवळ लिमलेटच्या किंवा ज्येष्ठमधाच्या गोळ्या, सनस्क्रीन, मुलींसाठी लिपबाम, सोबतच एक रुमाल कायम आपल्या जवळ ठेवावा. याशिवाय काही गोष्टी ज्या तयारीत महत्वाच्या आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. मस्त तयारी करा आणि झकास फिरुन या… 

- निहारिका पोळ सर्वटे 
Powered By Sangraha 9.0