विद्यार्थी मित्रांनो.. दिवाळी नंतरचं आर्थिक गणित..

23 Oct 2019 13:29:16



 
 
मित्रहो..!! दिवाळी बस आता ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आणि नाही म्हटलं तरी सणासुदीचा खर्च हा भरपूर होतोच. आणि अशा वेळी आपण देखील खर्चाचा फार विचार करत नाही, तो करूही नये. मात्र हा खर्च प्लान करुन करावा. आता दिवाळी झाल्यानंतर हे आर्थिक गणित कसं बसवायचं. Let us talk about this… 

तुमच्या पैकी काही स्टूडंट्स असतील त्यांना दिवाळीत घरी जाण्यासाठी असलेला खर्च असेल, किंवा घरच्यांसाठी छोटं मोठं काहीतरी घेऊन जाण्याचा खर्च असेल. किंवा घरी गेल्यावर काही आवडलं तर तो खर्च, किंवा भाऊबूजेला बहिणींवर मनसोक्त करण्यासाठीचा खर्च. या सगळ्यात पॉकेटमनी संपला.. मग परत आपल्या ठिकाणी आल्यावर काय करायचं? 

तर… 

१. पॉटलक किंवा डब्बा पार्टी : तुम्ही चार पाच मित्र मिळून एखाद्या मित्राच्या घरी, किंवा हॉस्टेलवर किंवा रूमवर डब्बा पार्टी करु शकता, किंवा पुढचा एक आठवडा कॉलेजमध्ये रोज कुणीतरी एखादा पदार्थ करुन आणायचा, जे त्याच शहरात राहणारे असतील त्यांनी आपल्या मित्र मैत्रीणींसाठी जास्तचा डब्बा आणायचा. मिळून मिसळून खाण्यापिण्याचा खर्च करायचा. याचा फायदा असा आहे की यामुळे एकावरच खर्च येणार नाही, मेसचे किंवा डब्याचे पैसे वाचतील, बाहेर खाण्याचा खर्च वाचेल आणि थोडी बचत होऊन डब्बा पार्टीचा आनंदही घेता येईल. 


 
 
 
२. पब्लिक ट्रांसपोर्टचा अधिक वापर किंवा गाडी शेअर करणे : समजा तुमच्याकडे आणि तुमच्या मैत्रीणीकडे गाडी आहे. आणि तुमचा कॉलेजला जाण्या येण्याचा रस्ता एकच आहे. तर तुम्ही आळीपाळईने गाडी शेअर करु शकता. याचा फायदा असा कि तुमचा पेट्रोलचा खर्च वाचेल, सोबतच एकत्र जाण्याची मजा पण घेता येईल. ज्यांच्याकडे स्वत:चं वाहन नाही, त्यांनी ऑटोने जाण्यापेक्षा बसेस किंवा मेट्रोचा वापर करावा, याचा फायदा असा कि ऑटो पेक्षा कमी खर्चात तुम्ही कॉलेजला पोहोचू शकता. 

३. घरून भरपूर फराळ सोबत आणणे : आता हा मुद्दा खरं तर बालिश वाटेल. मात्र जेवणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा अधिकांश पैसा हा अटर सटर खाण्यात जातो. यावर कुठल्याही आईचा आणि कुठल्याही विद्यार्थ्याचा विश्वास नक्कीच बसेल. अशा वेळी अशा अटर सटर खाण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा आईच्या हातच्या फराळाची मजा घ्यावी. याने बचतही होईल, आणि आईचे प्रेम पुन्हा पुन्हा अनुभवता येईल. 
 

 
 

४. बचतीचा विचारपूर्वक वापर करणे : मागील ‘अरे देवा सेव्हिंग्स…’ या लेखाप्रमाणे आपण सगळ्यांनी थोडी फार बचत केलीच असणार हे गृहीत धरून या बचतीचा योग्य आणि विचारपूर्वक वापर या काळात करावा. म्हणजे एखादी वस्तू खूप आवश्यक असेल तरच या वेळी घ्यावी अन्यथा नंतर घेतली तरी चालेल, क्रियेटिव्ह विचार करून एखादी वस्तु हवी असल्यास ‘डीआयव्हाय’ म्हणजेच डू इट यूअर सेल्फ पद्धतीने बनवावी. किंवा तत्सम काही गोष्टींच्या माध्यमातून बचतीचा विचारपूर्वक वापर करावा. 
 
 
 
 

हे काही ज्ञान डोस नाहीत. तर एक मैत्रीपूर्ण सोल्युशन आहे. दिवाळीमध्ये झालेल्या खर्चानंतर आर्थिक गणित जमवणे, खर्चाला बॅलेंस करणे आणि बचत करणे यामुळे दिवाळी तर एंजॉय करताच येईल सोबतच त्यानंतर देखील पैशाची चणचण भासणार नाही. Think Creative, Plan, Save money and live happily.


Powered By Sangraha 9.0