केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची घोषणा केली होती. तो कार्यक्रम उद्या म्हणजे ७ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या वेळी यामध्ये विद्यार्थ्यासोबत पालक आणि शिक्षक यांनाही सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमाच्या नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंदणी केली आहे. innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती.
'परीक्षा पे चर्चा' हा असा कार्यकम आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. परीक्षेच्या वेळी तणाव कसा हातळावा आणि एकंदरीत पुढे आयुष्यात उपयोगी पडतील अशा गोष्टी ते विद्यार्थ्यांसोबत करतात. मागील वेळी असाच पहिला कार्यक्रम 16 फेब्रुवारी 2018 मध्ये ऑफलाईन पद्धतीने पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण यावेळी कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून होणार आहे अशी घोषणा मोदींनी आपल्या ट्वीटर अकाऊंट वरून ट्वीट करून केली.
आपण आजची दैनदिन जीवन पद्धती पहिली तर सगळीकडेच तणाव दिसून येतो. त्याला विद्यार्थी वर्ग विशेषतः बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी अपवाद नाहीत. या वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले की पुढचा प्रवास त्यांना सुखकर होतो. नक्कीच या कार्यक्रमाचा फायदा तरुणवर्गाने घेतला पाहिजे.