भारतात 1 मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणाला सुरुवात

    28-Apr-2021   
|
 
 
 
ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बल: |
तस्मात ऐक्यं प्रशंसन्ति दॄढं राष्ट्र हितैषिण: ||

एकता हे समाजाचे बळ आहे, ज्या समाजात एकता नाही तो समाज दुर्बळ असतो, यामुळेच राष्ट्रहिताचा विचार करणारे नेहमी एकतेला महत्व देतात.
(Unity is the strength of any society and it (society) is weak without unity. Hence well wishers of the nation strongly praise unity.)


vaccination_1  
 
हे वाक्य तुम्ही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच राष्ट्रीय एकता दिवस या निम्मिताने ऐकले असेल. आता या एकतेचा आज काय संबंध बुवा असा संघर्ष तुमच्या डोक्यात सुरु झाला असेलच. तर विषय असा आहे की हा विषय सगळ्यांनाच माहित आहे. कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याविरुद्धची लढत कोरोना योद्धे देत आहे. त्यात आपले आरोग्य खात्याशी संबंधित संपूर्ण विभाग, तसेच पोलीस खाते, सफाई कर्मचारी, अत्यावशक सेवेसाठी काम करणारी मंडळी आणि अशा अवघड वेळी देशाची अर्थव्यवस्था थांबू नये यासाठी झटणारा समाजवर्ग यांचा समावेश होतो. राहिलेला समाजातील घटक म्हणजे सामान्य माणूस. अशा समयी या सामान्य माणसाची सुद्धा समाजाप्रती कर्तव्ये आहेत. कोरोना महामारी(Corona pandemic) ही अशी लढाई आहे जी संपूर्ण समाज वर्गाने एकत्र येऊन लढली तरच आपण जिंकणार आहोत. लढताना या समाजातला एकही घटक गहाळ पडला तरी त्याचे नुकसान संपूर्ण समाजाला होणार आहे. म्हणून इथे एकतेचे आणि सर्वांनी येऊन केलेल्या प्रयत्नांचे महत्व जास्त आहे. छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच मोठे गड जिंकता येतात. असेच छोटे छोटे प्रयत्न आतापर्यंत कोरोना योद्ध्यांनी केले आहेत. आता वेळ आली आहे या समजावर्गाची जो १८ वर्षावरील वयोगटात मोडतो. विषय आहे 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाचा(Vaccination).
 
16 जानेवारी पासून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली. फेज 1 मध्ये फ्रंट वॉरीयर्सच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. फेज 2 च्या लसीकरणात जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. 1 मे पासून सुरु होणाऱ्या फेज ३ मध्ये १८ वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. फेज ३ चे महत्व अधिक आहे कारण यात देशातील सगळ्यात मोठ्या वर्गाचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग , भारताचे भविष्य. म्हणून तरुण वर्गाने लसीकरणाचे महत्व समजून घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी दाखवली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नांतून झालेल्या लसीकरणाला मोठे यश आले आहे. आणि तसा प्रतिसादही समाज वर्गाकडून मिळत आहे. आतापर्यंत १४.६५ करोड लसींचा वापर करण्यात आली आहे. एन वेळी ऑक्सिजन आणि हॉस्पिटल बेड शोधण्यापासून लस तुम्हाला काही प्रमाणात वाचवू शकते. 
 
 
 फेज ३च्या लसीकरणाच्या नोंदणीला २८ एप्रिल म्हणजेच आज पासून सुरुवात होणार आहे. यासंबंधित सर्व माहिती तुम्हाला www.cowin.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लसीकरणाचे नियम समजून तुम्ही इथे स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकता. लसीकरणाआधी रक्तदान करण्याचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. संबंधित डॉक्टरशी कन्सल्ट करून निर्णय घ्यावेत. समाज माध्यमांवर वेगवेगळ्या पद्धतीने लसीकरणा संबंधी अफवा पसरवल्या जात आहेत. जसे की लसीकरणाचा आणि महिलाच्या मासिक पाळीचा संबंध या विषयी साफ खोट्या अफवा पसरत आहेत. लसीकरनाबाबतची खरी माहिती आपण ट्वीटर वरील PIB India आणि Ministry of Health या ऑफीशिअल ट्वीटर हँडल वर उपलब्ध आहे. कोणत्याही तथ्यावर विश्वास ठेवण्याआधी ते या ट्वीटर हंड्ल वर जाऊन पडताळून पहा. कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा,घरी रहा आणि सुरक्षित रहा.