पंचायती राज दिवस- देशाच्या विकासाची गावाकडून सुरुवात

    24-Apr-2021   
|

भारताचे महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी पाहिलेलं स्वप्न पहिल्यांदा २४ एप्रिल १९९३ रोजी सत्यरुपात उतरायला सुरुवात झाली. भारतातील राज्यघटनेत केल्या गेलेल्या ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार केंद्र आणि राज्यासोबतच स्थानिक पातळीवरही काही अधिकार विभागून देण्यात आले. महात्मा गांधी यांच्यानुसार खरा देश हा गावांमध्ये वसतो म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर सुरुवात स्थानिक पातळीवरूनच करावी लागेल असं त्यांचे म्हणणे होते. असंही नव्हते की ब्रिटीशांच्या काळात स्थानिक पातळीवरील प्रशासनाला महत्व नव्हते. सुरळीत आणि सुटसुटीत प्रशासन चालवायचे असेल तर त्या त्या स्तरावर अधिकारांची आणि जबाबदार्यांची विभागणी होणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले होते. तश्या तरतुदीसुध्या ते वापरत होते.

 
Naredra Modi_1  
 
अर्ध्यापेक्षा जास्त भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे विकासातही त्यांनी स्वतंत्र वाटा उचलने गरजेचे होते म्हणून अनेक विघ्न पार करून का होईना स्थानिक पातळी वरील प्रशासनाला महत्व दिले गेले. हा कायदा संमत झाल्यापासून ग्रामीण भागातील लोकांना आपली देशाच्या विकासाप्रती असलेली जबाबदारी समजू लागली. मग ते दर पाच वर्षांनी घेतल्या जाणार्या निवडणुकांत मतदान करणे असो किंवा ग्रामीण प्रशासनात सहभागी करण्यात आलेल्या महिलांचा विषय सामान्य व्यक्तीला समजू लागला. ग्रामसभा हा ग्रामपंचायतीमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ग्रामसभेतील सदस्य गावाच्या वतीने निर्णय घेत असतात. या कायद्याआधी गावांना स्वतःचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर अवलंबून राहवे लागत होते. आता मात्र स्वतंत्रपणे ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून महसूल गोळा करू शकते आणि न अडखळता विकासाच्या मार्गी लागू शकते.
 
 
प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी काही कायदे तयार करू शकते. लोकशाहीमध्ये मतदान हा खूप महत्वाचा घटक आहे. राज्य निवडणूक आयोगावर या पंचायती राजच्या स्वतंत्र निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. अश्या पद्धतीने स्थानिक पातळीवर लोकांचा विकासात सहभाग वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी योजना राबवत असतात. मागच्याच वर्षी २४ एप्रिल २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व( SVAMITVA)आणि 'ई-ग्राम स्वराज' (e gram swaraj) सुरु केली आहे. ज्याचा उपयोग गावाकडील मालमत्ता या विषयाबाबत संभ्रम दूर होऊन बरेचसे वाद मिटवण्यासाठी मदत होईल. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. सर्व देशाला पंचायती राज दिवसाबद्दल शुभेच्या देत आपण लवकरात लवकर या महामारीतून बाहेर पडू अशी आशा व्यक्त केली.