भारत ही अशी भूमी आहे ज्या भूमीला अथांग कर्तुत्व असलेले आदर्शवादी भूमीपुत्र लाभलेले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. एक आदर्श शिक्षक, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपति आणि देशाचे दूसरे राष्ट्रपति. भारतात दरवर्षी १७ एप्रिल रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. १७ एप्रिल १९७५ मध्ये दीर्घकाळ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देशाची घडी बसवण्यात मोठा वाटा असलेल्या एका भूमिपुत्राला भारताने गमावले. यांचा जन्म तमिलनाडु मधील तिरुत्तानी मध्ये ५ सप्टेंबर १८८८ ला झाला. त्यांना सुरुवातीपासूनच शिक्षणामध्ये रुची होती.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लहान वयात मोठमोठे ग्रंथ वाचून काढण्याबरोबरच काही पुस्तकेही लिहली. 'दि एथिक्स ऑफ वेदान्त एंड इट्स मटेरियल सपोजिशन' हे त्यांनी लिहलेलं पाहिलं पुस्तक आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भारतीय शिक्षण क्षेत्रात इतके योगदान आहे की त्यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरी केला जातो. यांनी धर्म, विज्ञान आणि शिक्षा या संबधीत विषयांवर फक्त लिहलेच नाही तर त्याचा संबंध मानवी जीवनाशी जोडून मनुष्य प्राण्याचे जीवन कशा पद्धतीने सुखकर होईल या गोष्टी सांगण्यावरही भर दिला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपति म्हणून १९५२ ते १९६२ पर्यंत काम केले. यांनतर १९६२ ते १९६७ पर्यंत त्यांनी भारताचे दूसरे राष्ट्रपति म्हणून काम केले. राधाकृष्णन यांनी गौतम बुद्धा, जीवन आणि दर्शन, धर्म आणि समाज, भारत आणि विश्व इत्यादी अनेक विषयांवर पुस्तके लिहली आहे. भारतीय शिक्षण आणि राजनीति मधील योगदान पाहता १९५४ मध्ये मध्ये त्यांना भारताचा सर्वात उच्च मानला जाणार भारतरत्न या पुरस्काराने सम्मानित केले आहे.