प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मैत्री सेतूचे उद्घाटन

    09-Mar-2021   
|
 
 
maitri setu _1  
 
 
आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मैत्री सेतूचे(Maitri Setu) उद्घाटन वीडियो कॉन्फ्रेंसिंगमधून केले. मैत्री सेतू हे नाव भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाढत्या मैत्रीच्या स्वरूपावरून ठेवण्यात आले आहे. मैत्री सेतू भारतातील त्रिपुरा आणि बांग्लादेश याच्यातील फेनी या नदीवर बांधण्यात आला आहे. या पुलाला बांधण्याचे काम नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (NATIONAL HIGHWAYS & INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LTD.) केले आहे. त्यात लागभाग १३३ करोड खर्च करण्यात आला.
 
भारतातील सबरूम आणि बांग्लादेशमधील रामगढ यांना जोडणारा हा सेतू १.९ किमी लांबीचा आहे. या सेतूच्या बांधणीमुळे त्रिपुराची ओळख “ गेटवे ऑफ नॉर्थ-इस्ट”(Gateway of North-East) अशी होऊन भारताला चित्तागोंग बंदर(Chattogram Port) चा वापर करता येईल. या समारंभात वेगवेगळ्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे चित्तागोंग बंदर पासून ८0 किमी अंतर असलेल्या सबरूम येथे चेक पोस्ट स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
मैत्री सेतू व बाकी योजनांच्या उद्घाटनामुळे तेथील ठिकाणांचा विकास होईल. मैत्री सेतू मुळे दोन्ही देशात आयात निर्यात वाढेल ज्याचा फायदा उत्तर-पूर्व भागात विकास होण्यात होईल.