प्राचीन काळापासून भारतात होळी हा सण मोठ्या जल्लोषाने साजरी केला जातो. विशेषकरुन तरुणवर्गाचा सहभाग यात दिसून येतो. फाल्गुन, मराठी महिन्यांपैकी शेवटचा महिना आणि या महिन्यात येणारी पोर्णिमा म्हणजे होळी पोर्णिमा. भारतात वेगवेगळ्या भागामध्ये या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. उत्तर भारतात तर या सणाला विशेष महत्व असते. 2 दिवस हा रंगाचा सण साजरी केला जातो. सगळे रुसवे फुगवे सोडून आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांना रंग लावून नात्यांची नवी सुरुवात केली जाते.
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोना महामारीमुळे होळी सण साजरी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्रात त्यासोबतच भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सरकारने वेगवेगळे नियम लागू केले आहे. काही अर्थी या वर्षाची होळी साजरी करण्यात रंगांची उधळण कमी जाणवेल. पण कोरोना अजून टळला नाही याची जाणीव ठेऊन नागरिकांनी हा सण साजरी केला पाहिजे.
सोशल मेडियावर आपले लाडके कलाकार, प्रेक्षक वर्गाला निरनिराळ्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे यावर्षी होळी एवढ्यावरच भागवावी लागणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी भारतवासीयांना ट्वीट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या. ट्वीटरवर #Happy Holi , #होली, #होलिकोत्सव, #रंगोत्सव #रंग बरसे अशा विविध Hashtag च्या नावाखाली एकमेकांमध्ये सोशल अंतर पळून भारतभर शुभेचांचा उत आला आहे. Fikarnot परिवाराकडून आपल्या सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा.