२६ मार्च रोजी 'भारत' बंदची हाक

    25-Mar-2021   
|
 
 केंद्र सरकारने कृषी कायदा पास केल्यापासून राजधानी दिल्लीमध्ये व आजूबाजूच्या काही राज्यात शेतकरी आंदोलनाने जोर धरला होता. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळापासून ही परिस्तिथी काही प्रमाणात निवळलेली दिसते. पण आंदोलन अजूनही चालू आहे. २६ मार्च रोजी या आंदोलनाला ४ महिने पूर्ण होतील. या निम्मिताने देशात वेगवेगळ्या भागातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत 'भारत बंद' ची हाक देण्यात आली आहे.

bandh_1  H x W:
 संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशात वेगवेगळ्या भागात पोहचून पाठींबा मिळवला जात आहे. या आंदोलनाला वेगवेगळ्या पक्षांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यात राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीने आपल्या ट्वीटर खात्यावर ट्वीट करून भारत बंद ला पाठींबा दर्शवला आहे. तसेच या भारत बंद हाकेच्या मागे कामगार कायदा आणि इंधन दरवाढ ही सुद्धा करणे असू शकतात.
अशाप्रकारे 'भारत बंद' या विषयावर सध्या ट्वीटरवर #कल_भारत_बंद_रहेगा या Hashtag च्या खाली भारतातील वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यासोबतच याउलट #BharatBand_NhiHoga हा Hashtag सुद्धा प्रसिद्ध होत आहे. किसान आंदोलनच्या पाश्वभूमीवर मागील काही घडलेल्या घटना पाहत पुढे भारत बंदच्या दिवशी काय घडेल हे बघण्यासारखे असेल.