'जनता कर्फ्यू' वर्षपूर्ती एका ऐतिहासिक घटनेची
|
२०२० हे साल असे आहे जे पृथ्वीवर राहणारा कोणताही मनुष्यप्राणी विसरू शकत नाही. जसे इतर गोष्टींची वर्षपूर्ती साजरी केली जाते अगदी तशीच ‘जनता कर्फ्यू’ लागलेल्या दिवसाची वर्षपूर्ती आज मोठ्या जोमाने आणि काही प्रमाणात गमतीने साजरी होताना दिसत आहे. विषय जरी गमतीशीर असला तरी ती वेळेची गरज होती. या कोरोना महामारीचा परिणाम सगळ्याच क्षेत्रावर झाला आहे.
जगामध्ये कोरोना धुमाकूळ घालत असताना काही रुग्ण भारतात आढळायला लागले होते त्याची खबरदारी म्हणून भारत सरकारने वेगवेगळी पावले उचलायला सुरुवात केली होती. १९ मार्च रोजी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केले होते. त्यात त्यांनी पहिल्यांदा 'जनता कर्फ्यू' हा शब्द वापरला होता. २२ मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर निघू नये अशी घोषणा त्यांनी केली होती. याचा आदर राखत भारतीय जनतेने शांततेत जनता कर्फ्यू अनुभवला होता आणि पुन्हा एकदा जगाला भारताची एकता आणि बंधुता याचा परिचय दिला.
२०२० वरून २०२१ साल आले तरी अजून कोरोनाचा परिणाम कमी झालेला दिसत नाही. कोरोना लसीचे वितरण सध्या मोठ्या प्रमाणात केले जात आहे. तरी देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा असाच लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू लागेल की काय, याची भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. ट्वीटर वर या वर्षपूर्तीवर वेगवेगळ्या वर्गातून ट्वीट केले जात आहे. #JanataCurfew हा hashtag वापरून बरचसे Memes आणि विडीओस सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
अजूनही कोरोना गेलेला नाही हे रोज वाढत्या रुग्णावरून दिसत आहे म्हणून आता जरी लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू नसला तरी सरकारने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दिलेली नियमावली पाळणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.