दोन दिवस झाले नळ येत नाहीये... बोरवेल आणि मिनरल वॉटर नी काम चालू आहे... आणि गरमी म्हणते मी.....44डिग्री तापमान झालं आहे...घरातूनच काम सुरू आहे, अशातच सहज काल टाइमपास करता-करता एक शॉर्ट-फिल्म पाहिली....पानीपथ…
नावावरून वाटत होतं कि पानीपत संग्राम वर डॉक्युमेंटरी असेल, इतिहासाची आवड म्हणून पहायला सुरूवात केली, पण ते 10 मिनिटं इतके खोलवर मनात रूतले कि रात्री झोपच लागे ना.......सत्य घटनांवर आधारित होती ती शॉर्ट-फिल्म, चेहरे फार ओळखीचे नव्हते पण एक्टिंग उत्तम करत होते....
आता थोडं कहाणी बद्दल.....
एका बंगल्यावर झाडू-पोछा आणि इतर कामं करून ती घराकडे निघते..... पाई.... त्या नंतर लोकल... नंतर पुन्हा पाई... संध्याकाळ होते…
घर म्हणजे काय एक खोली, एक जुणं-पुराणं शेल्फ, एक टेबल.. त्याचावर ठेवलेला गैस-चूल्हा, लाईन गेलेली असते... कपडे बदलून रात्रीच्या जेवणाची तयारी करणार तेवढ्यात तहान लागली म्हणून कळशीतून पाणी घेऊ पाहते , तर पाण्याचा एक थेंबही नाही.... बादली, पिंप सगळं पाहते तर कळतं कि घरातच पाणी नाही...
कोरडा घसा घेऊन लगबगीने निघते... एक केन तरी पाणी मिळालं पाहिजे, नवरा कामावरून येईल त्या आधी.. नाहीतर आजही मार बसेल.... मुलीला शोधायचा प्रयत्न करते तर मुलगी मैत्रिणींसोबत खेळण्यात दंग असते.... काय करेल ती फक्त 14 वर्ष वय तिचं....
आईला पाहून मुलगी कावरी-बावरी होते, तिला आईची रियेक्शन माहित असणार बहुतेक... होतं तसंच... सणसणीत चपराक बसते तिला कानाखाली....
"कुठे गेली होती गं"????
पाणी का नाही आणलं????
मुलगी गाल चोळत उत्तर देते... आई शाळेला गेले होते....
"चुप......
तुझा बाप आला तर काय उत्तर देऊ आता????
ती काही न बोलता घराकडे निघते....
आता पुन्हा पाणीपथावर ती एकटीच चाललेली असते...
बऱ्याच वेळाने रेलवे ट्रैक ओलांडून एका घरापर्यंत पोहचते... बेल वाजवते... एक उन्मत्त आणि कठोर स्त्री समोर येते , तिला 20 रूपये देत पाण्याची बाटली मागते....
पण पाण्याकडे पाहून पुन्हा परत करून देते... "बोत गंदा है ये"
"ऐसाईच है लेनेका है तो बोल"???
ती नकार देते आणि पुढे वाढते....
थोड्या अंतरावर एक दुकान दिसतं... त्याचाकडून एक बिसलेरी विकत घेते.... थंड बाटली ची किंमत दोन रूपये जास्त म्हणून नॉर्मल पाणी घेते....
घसा अजूनही कोरडाच आहे...
चालून-चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली आहे....
संपूर्ण शरीर घामाघूम झालेलं आहे पण ती चालतेय....
अनवरत......
नवरा यायचा आत तिला जेवण तयार करायचं आहे, उद्या सकाळी पाणी भरायला रेलवे चा नळावर जायचं आहे...
घरापासून दोन किलोमीटर तरी लांब असेल.... पण जायचं आहे... इतके सगळे विचार करत ती झपाझप पावले टाकतं चालून राहिली आहे......
अंधार झालाय... अर्ध्या तासात नवरा घरी येईल....
थकून-भागून येतो बिचारा आणि थकला कि दारू या शिवाय पर्यायच नाही, काय करेल ना??? इतकी मेहनत करतो दिवसभर.......
घरी पोहचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावते मग भाजी-पोळी.... या सगळ्या विचारात पाण्याचा घोट घेणं विसरूनच जाते..... भराभरा स्वैपाक करायचा आहे न.......
कुकर झाला...भाजी झाली आता फक्त पोळ्या करायचा राहिल्या आहे.......मनात विचार सुरू असतांना दाराचा आवाज होतो.... खाकी रंगाचे कपडे घातलेला... गळ्याला रूमाल लावलेला तिचा नवरा घरात येतो... आल्याआल्या मुलीला विचारतो.. काय गं शाळेत गेली होतीस ना????
हळू आवाजात ती म्हणते... "हो"
टेबलजवळ जातो , बिसलेरी ची अर्धी उरलेली बाटली सरळ तोंडाला लावतो.... बायको त्याचाकडे बघत असते....
एका क्षणात तो बाटली संपवून तिचाकडे बघतो......
"आज फार गरम आहे ना"??? ती पडलेल्या चेहऱ्याने हम्मम असा होकार देते.....
तिचा घसा अजूनही कोरडाच.......
"मी आंघोळ करून येतो.... नवऱ्याचा आवाजाने तिची तंद्री भंग होते"......
आता तिचे हातपाय गळून जातात... अरे.....
ती प्रेमाची एंक्टिग करत जवळ जाते.... हात धरून म्हणते
"आधी गरम-गरम जेवण करून घ्या"
तो तिला दूर करत म्हणतो.... "ठीक ए ठीक ए" आणं
त्याला जेवायला वाढून हळुच मुलीला बाहेर बोलवते....
पाण्याची केन हातात देऊन म्हणते "जा पाणी घेऊन ये"
लवकर आण नाही तर दोघींची खैर नाही....
ती 14 वर्षाची पोर रात्रीच्या काळोखात केन घेऊन "पाणीपथावर" पावले टाकतं गाणं गुणगुणत जात असते....
जवळचा हैंडपंपावर पाणी काही मिळत नाही.
मग ती रेल्वे ट्रैक जवळच्या नळाला जायला निघते....
इकडे आई तिची वाट बघत असते....
पोटभर जेवण झाल्यावर नवरा हात धुवायला पाणी मागतो... तर...
पाण्याचा एक थेंबही घरात नाही हे त्याला कळतं......
"तू करत काय असते घरात बसून.. पाणी भरायला नको का वेळेवर...... त्याची अखंड बडबड सुरू होते...
पण हिच्या डोक्यात फक्त आपली 14 वर्षाची लेक फिरत असते... अजून कशी आली नाही???
नवऱ्याकडे दुर्लक्ष करत ती पायात चपला घालते आणि मुलीला शोधायला निघते.....
इतक्या दूर जायची काय गरजं होती हिला???
पाणी लवकर आणायला पाहिजे होतं.....
सगळीकडे शोधून झाल्यावर पण मुलीचा काही पत्ता लागत नाही... आता ती रेल्वे ट्रेक कडे धाव घेते....
"नक्की त्या नळावर गेली असणार"....
पाणी इतर कुठे नाही मिळालं तरी रेल्वेचा नळाला नक्की मिळतं....
घसा अजूनही कोरडाच होता.... धावतच ती तिथे पोहचायचा प्रयत्न करत होती....
काय किमया आहे न या पाण्याची..... जे देवाने आपल्याला फुकट दिलं आहे ते मिळवायला कखाद्याला किती किंमत मोजावी लागते.....
एक टैप दाबलं कि पाण्याची धार आपल्याला मिळते, रोजच्या जीवनात कित्ती पाणी आपण वाया घालवतो, अनावश्यक कामांसाठी..
पण कधीही हा विचार करतो का कि याच पाण्याचा एका-एका थेंबासाठी लोकं किती आणि काय -काय
करत असतात, मैलोनमैल चालतात, विकत घेतात, दूषित पाणी वापरतात... आणि बरचं काही...
आज दोन दिवस घरात गोड़ पाणी नाही तर आपण शेड्युल चेंज करतो... हेयरवॉश करणार नाही.....भारीतले कपडे धुणार नाही.... पण त्यांच काय..... कधी विचार केलाय???? मग आता तरी करा....
तर पुढे होतं असं कि धावत धावत ती रेल्वे ट्रैक पर्यंत पोहचते पण तिथेही मुलगी काही सापडत नाही......
आता ती जोरात ओरडू लागते.... मुलीला हाका मारते..... पण उत्तर काही येत नाही.....
काहीवेळ शोधल्यावर तिला ट्रैक चा बाजूला एक चप्पल पडलेली दिसते..... ती चप्पल तिचा मुलीची असते... क्षणार्धात तिच्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं.....
आता तिच्या काळजात धस्स... होतं, ती मोठ्याने ओरडते... किंचाळते... रडते.... पण तिचा आवाज ऐकणारं तिथे कोणीच नसतं.....
पुन्हा त्या पानीपथावर ती एकटीच उरते.......
त.टी : ही शॉर्टफिल्म तुम्ही हॉटस्टार वर बघू शकता.. त्याची लिंक वर देण्यात आली आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला त्यावर मिळेल.