शंकराला तांडव केल्यानंतर ज्या शांततेचा अनुभव होतो, तीच शांतता कदाचित तांबेला मिळाली असणार. विसर्जनाच्या मिरवणूकीत एक रिक्शेवाला आणि मिरवणूकीत नाचणाऱ्या सामान्य माणसात भांडण होते, आणि ते सोडवण्यासाठी ते तांबेची मदत घेतात. मात्र आपल्या जीवनात आधीच त्रस्त झालेला हवालदार तांबे अधिकच चिडतो आणि आपली बंदूक बाहेर काढतो.. आणि मग? मग काय होतं? ते या लघुपटात बघा.
या लघुपटातील तांडव म्हणजे नेमके काय? हे तर तुम्हाला हा लघुपट बघूनच कळेल. मी त्या बाबत जास्त सांगितले तर लघुपटाची मजाच निघून जाईल. त्यामुळे हा तांडव तुम्ही स्वत:च बघा. या लघुपटाची खासियत म्हणजे नेहमीप्रमाणे मनोज बाजपेयी याने या लघुपटात अप्रतिम काम केले आहे. कृति, आउच या प्रमाणे या लघुपटात देखील त्याने आपले काम चोख केले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे देवाशीष माखिजा यांनी. यूट्यूबवर या लघुपटाला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.
विशेष टीप : लघुपटाच्या शेवटच्या दृष्यासाठी तरी हा लघुपट नक्कीच बघा.